स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: गावठी बनावटीची पिस्तूल आणि काडतुसे जप्त

बातमी लाईव्ह न्यूज | 2 ऑगस्ट 2025 |नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयिताकडून गावठी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये ३० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
गोपनीय माहितीचा आधारे कार्यवाही
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, म्हसावद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तलावडी गावात रुबाबसिंग पावरा नावाचा एक व्यक्ती बेकायदेशीरपणे गावठी बनावटीची पिस्तूल आणि काडतुसे बाळगत आहे. या माहितीच्या आधारे, पाटील यांनी तात्काळ आपल्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले.
30 हजार रुपये किमतीची एक गावठी बनावटीची लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली.
पथकाने तातडीने तलावडी गावात जाऊन रुबाबसिंग वनसिंग पावरा (वय 30, रा. तलावडी, ता. शहादा, जि. नंदुरबार) याला त्याच्या घरातून ताब्यात घेतले. त्याची चौकशी करून घराची झडती घेतली असता, पोलिसांना घरातून 30 हजार रुपये किमतीची एक गावठी बनावटीची लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे सापडली. पोलिसांनी ही पिस्तूल आणि काडतुसे कायदेशीर प्रक्रियेनुसार जप्त केली आहेत.
भारतीय हत्यार कायद्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी रुबाबसिंग पावरा आणि त्याला पिस्तूल देणारा सजन खरडे (रा. अंबापूर, ता. शहादा, जि. नंदुरबार) या दोघांविरुद्ध म्हसावद पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस. आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस हवालदार मुकेश तावडे, जितेंद्र पाडवी, विशाल नागरे, पुरुषोत्तम सोनार, सचिन वसावे, पोलीस नाईक विकास कापुरे आणि पोलीस शिपाई अभय राजपूत यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर वचक बसण्यास मदत होणार आहे.