
बातमी लाईव्ह न्यूज ! नंदुरबार नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, नवनिर्वाचित नगराध्यक्ष जयवंत पांडूरंग जाधव यांनी आज आपला पदभार अधिकृतपणे स्वीकारला. नवापूर नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने 20 जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
या विजयानिमित्त राष्ट्रवादी चे नेते भरत माणिकराव गावित यांच्या कार्यालयापासून शहरात भव्य रॅली काढण्यात आली. फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजीने नवापूर शहर रॅली काढण्यात आली गेले रॅलीदरम्यान द्वारकेश्वर, नागेश्वर, सोन्या मारुती आणि गणपती मंदिरात जाऊन नवनिर्वाचित प्रतिनिधींनी दर्शन घेतले. नवापूर नगर परिषद कार्यालयाच्या पायरीला नतमस्तक होऊन जयवंत जाधव यांनी मुख्याधिकारी डॉ. मयूर पाटील यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. यावेळी त्यांनी संविधानाची शपथ घेत पारदर्शक आणि लोकहितकारी प्रशासन देण्याचा संकल्प केला.




