नंदुरबारराजकारण

नंदुरबार नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला

भाजप पेक्षाही मोठा भाऊ शिवसेना ,शिंदे आमदारांच वक्तव्य....


एका जिल्ह्याची हुकूमशाही या जिल्ह्यात चाललेली होती ती मोडून काढली….

जिल्ह्याला वेठीस धरण्याच पाप एका कुटुंबीयाने केल…

लोकांचा संताप निवडणुकीतील व्यक्त झाला लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवली….

एका परिवारामुळे जिल्ह्यात भाजपला पडझड लागली..

बातमी लाईव्ह न्यूज ! नंदुरबार  – नुकत्याच पार पडलेल्या नंदुरबार नगरपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पुन्हा एकदा शिवसेनेने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निवडणुकीत शिवसेनेने दणदणीत विजय मिळवला असून, नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या रत्ना रघुवंशी या 11 हजार मतांनी विजयी झाले आहे.

शिंदे गटाचे चंद्रकांत रघुवंशी यांनी नाव न घेता भाजप आमदार डॉक्टर डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात एका विशिष्ट कुटुंबाची हुकूमशाही सुरू होती, ज्यांनी संपूर्ण जिल्ह्याला वेठीस धरले होते. या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेने आपला संताप व्यक्त केला असून त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेने विश्वास दाखवल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नंदुरबार जिल्हयातील इतर नगरपरिषदांबाबत बोलताना रघुवंशी यांनी सांगितले की, केवळ नंदुरबारच नव्हे तर शहादा आणि नवापूरमध्येही शिवसेनेच्या विचारसरणीचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तळोदा नगरपरिषदेतही शिवसेनेची ताकद वाढली असून तिथे भाजपपेक्षा शिवसेनेचे जास्त नगरसेवक निवडून आले आहेत.जर काही तांत्रिक अडचणी आल्या नसत्या, तर चारही नगरपरिषदांवर शिवसेनेचा एकहाती विजय झाला असता असा दावाही त्यांनी केला.

पुढील पाच वर्षांच्या नियोजनाबद्दल बोलताना रघुवंशी यांनी सांगितले की, निवडणूक काळात शहराच्या जनतेला जी आश्वासने दिली आहेत, ती सर्व पूर्ण केली जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी शिवसेना कटिबद्ध असून, प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावण्यात येतील. नंदुरबार नगरपरिषदेवरील या विजयामुळे जिल्ह्यात शिवसेनेची पकड अधिक घट्ट झाली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button