क्राईम

धडगावमध्ये हृदयद्रावक घटना ; मध्यरात्री रस्त्यावर सापडलं एक ते दीड महिन्याचं बाळ

Heartbreaking incident in Dhadgaon; Happy child was found in the middle of the night for one to one and a half days


 

बातमी लाईव्ह न्यूज | 07 ऑगस्ट 2025 | धडगाव तालुक्यातील हरणखुरी मुख्य रस्त्यावर मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने अंदाजे एक ते दीड महिन्यांच्या स्त्री जातीच्या बाळाला रस्त्यावर सोडून दिलं. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

स्थानिक लोकांना मध्यरात्रीच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, एक लहान बाळ रस्त्याच्या कडेला आढळून आलं. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बाळाला ताब्यात घेतलं आणि त्याला तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

बाळाची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या अमानुष कृत्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून, बाळाला सोडून देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. या बाळाला नेमका कोणी आणि का रस्त्यावर सोडलं, याबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button